चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे येथे पोहण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणाचा डोहातील चिखलात पाय रुतल्याने, बुडून मृत्यू झाला आहे. हि घटना दि.१६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या पूर्वी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तांबोळे येथील अमजद अजनेर खॉं पठाण ( वय १५) हा तांबोळे शिवारात शेळ्या चारण्याचे काम करतो. बुधवारी शेळ्या चारत असताना, तो डोहात पोहण्यासाठी गेला. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय चिखलात रुतला आणि त्यांच्या बुडून मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
त्याला लागलीत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरानी त्याला तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वैद्यकिय आधिकारी यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रविण सांगळे करीत आहेत.