यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील किनगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या चाकू हल्ल्या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील किनगाव येथे दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. यात दोन्ही बाजूनी चाकू हल्ले करण्यात आले होते. यात दोन फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील पहिली फिर्याद किनगाव येथील दगडू नवाज तडवी यांनी दिली आहे. यात म्हटले आहे की, बुधवारी रात्री गावातील जुन्या फॉरेस्ट डेपोमध्ये भुरा शाह याने एका मुलीस तिचा मोबाईल क्रमांक मागितल्याने वाद झाला. यात रहीम शहासह त्यांचा मुलगा शफीक शहा रहीम शहा, सुल्तान शाह रहीम शहा व भुरा शाह रहीम शाह यांनी फिर्यादी दगडू तडवी, तसेच तौसिफ नजीर तडवी व शरीफ लुकमान तडवी यांना जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली. यात भुरा शाह आणि शफीक शाह यांनी फिर्यादी व साक्षीदार तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करत जखमी केले. या प्रकरणी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यासोबत सुल्तान शहा रहीम शहा यांनी देखील फिर्याद दिली. यानुसार बुधवारी रात्री भुरा शाह हा मुलीचा मोबाईल क्रमांक मागतो म्हणून फिर्यादीस मारहाण केली. त्याचे वडील रहीम शहा, भाऊ तोहीद शहा, शाहुद उर्फ भुरा शाह हे भांडण सोडवण्यासाठी आले. या सर्वांना संशयित दगडू नवाज तडवी, तौसिफ नजीर तडवी, शरीफ लुकमान तडवी व शाहरुख तडवी या चौघांनी मारहाण केली. यामुळे त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.