जळगाव ( प्रतिनिधी ) – किरकोळ कारणावरून शहरातील एक भागात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी २२ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित आरोपी जास्मीन राजू पटेल, आवेश राजू पटेल, दिशान मेहमुद पटेल, जामू संजू पटेल, संजू बिस्मिल्ला पटेल यांनी महिलेसह तिच्या बहिणीला शिवीगाळ कारणावरून मारहाण केली तर एकाने महिलेचा हात पकडून विनयभंग केला तर तिच्या बहिणीच्या अंगावरील कपडे फाडून डोक्यावर काहीतरी वस्तू मारून गंभीर दुखापत केली. महिलेने रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जास्मीन राजू पटेल, आवेश राजू पटेल, दिशान मेहमुद पटेल, जामू संजू पटेल, संजू बिस्मिल्ला पटेल यांच्यावर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.