जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याने पशुसंवर्धन खात्यातील पशुधन विकास अधिकारी, गट अ या संवर्गातील नाशिक विभागातील प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १० पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी बदल्या झाल्या आहेत.
बदल्यांबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. या बदल्यांमध्ये डॉ. मनीष बाविस्कर पशुधन अधिकारी, यांची जिल्हा परिषद येथून पशुधन अधिकारी, भांदली येथे, डॉ. प्रशांत येवले, यांची कुऱ्हे पानाचे येथून पशुधन विकास अधिकारी, भुसावळ येथे, डॉ.हेमंत वाघोदे, यांची पशुधन अधिकारी, किन्ही येथून पशुधन विकास अधिकारी, जिल्हा परिषद येथे बदली झाले आहे.
तसेच, डॉ. प्रमोद सोनोने, पशुधन विकास अधिकारी, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, धरणगाव येथून पशुधन अधिकारी, जिल्हा परिषद (डॉ. मनीष बाविस्कर यांचे जागी), डॉ. नितीन इंगळे, पशुधन अधिकारी, फैजपूर येथून पशुधन विकास अधिकारी, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, धरणगाव, डॉ. अभय दुग्रेकर, पशुधन अधिकारी, निमखेडी येथून पशुधन अधिकारी, वडोदबाजार ता. फुलंब्री, छ. संभाजीनगर, डॉ. रामदास जाधव, पशुधन अधिकारी, जि. प. मुख्यालय, जळगाव येथून पशुधन अधिकारी, अंतुर्ली ता. मुक्ताईनगर, डॉ. निलेश राजपूत, पशुधन अधिकारी, सावदा ता. रावेर येथून पशुधन अधिकारी, तांदळवाडी ता. रावेर, डॉ. प्रभाकर शिरसाठ, पशुधन अधिकारी (वि), रावेर – १ वर्षे मुदतवाढ, डॉ. मनोज पाटील, पशुधन अधिकारी, डांभुर्णी ता. यावल येथून पशुधन अधिकारी, निमखेडी यांचीही बदली झाली आहे.