जामनेर (प्रतिनिधी) – सकाळी जळगाव रस्त्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात् त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची जामनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.
वसंत कस्तुरे (वय – ६०) असे मयत इसमाचे नाव आहे. ते दररोज सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात असतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी १६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ते फिरण्यासाठी गेले असताना अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. दरम्यान घटनेची नोंद जामनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत वसंत कस्तुरे हे आशा हॉस्पिटल जामनेरचे संचालक डॉ. स्वप्नील सैतवाल यांचे वडील होते.