जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील कासामवाडी भागात ५ महिन्यांपूर्वी घडलेल्या चाकूहल्य्याच्या घटनेच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला आज पोलिसांनी पाळत ठेऊन अटक केली .
कासामवाडी भागात 16 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास सुनिल राठोड व त्याचे साथीदार रोहित भालेराव, अनिल राठोड, अमन सोनवणे यांनी चाकूने मारहाण करुन गंभीर दुखापत केली होती प्रशांत चौधरी यांने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्हयात यापुर्वी सुनिल राठोड, अनिल राठोड, अमन सोनवणे यांना अटक करण्यात आली होती गुन्हा घडल्यापासुन रोहित भालेराव फरार होता तो जळगाव येथे आल्याची माहिती पो नि प्रताप शिकारे यांना मिळाल्यावरुन त्यांस तुकारामवाडी येथुन सफो अतुल वंजारी, सुनिल सोनार, सुधीर साळवे, किशोर पाटील,
मुकेश पाटील, मुदस्सर काझी यांनी ताब्यात घेतल होते त्यांस अटक करण्यात येउन न्या ए.एस शेख यांच्या न्यायालयात हजर केले .न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. सरकारतर्फे अँड एस सुरडकर यांनी काम पाहिले.