जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील करंज शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी ३ हजार ७५० रुपये किमतीची बोरवेलची इलेक्ट्रिक वायर चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जिवराम सपकाळे (वय-४०) रा. करंज ता. जि. जळगाव हे शेतकरी असून आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह ते करतात. त्यांचे जळगाव तालुक्यातील करंज शिवारात गट नंबर- ९६ मध्ये शेती आहे. १४ मार्च रोजी सायंकाळी ७ ते १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतातील ३ हजार ७५० रुपये किंमतीची ७५ मीटर इलेक्ट्रिक केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आला आहे. चोरीबाबत परिसरात शोधाशोध केली.
याबाबत कुठलीही माहिती मिळून आली नाही. अखेर संजय सपकाळे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रशांत पाटील करीत आहे.