मुंबई ( वृत्तसंस्था ) – भारतात 3 जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात आली. आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना कोरोना लस मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यात 65 लाख बालके लसीकरणासाठी पात्र आहेत. 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना कोर्बेव्हॅक्स लसचे दोन डोस देण्यात येणार आहेत. दोन डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर असेल. ही लस सर्व मुलांना मोफत दिली जाणार असून त्यासाठी CoWIN अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. भारतात 12 ते 14 वर्षातील 7.74 कोटी मुलं आहेत. 60 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोस सुध्दा देण्यात येणार आहे.