जळगाव ( प्रतिनिधी ) – रिंगरोडवरील स्पा सेंटरमधील कामगार महिलेवर मालकाने अत्याचार केला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरियाणा राज्यातील २८ वर्षीय महिला कामाच्या निमित्ताने जळगावात वास्तव्याला आहे. रिंगरोडवरील सी सल्ट स्पा सेंटरवर नोव्हेंबर २०२१ पासून महिला नोकरीला आहे. दत्तू लक्ष्मण माने (रा. नाशिक) हा स्पा सेंटरचा मालक असून सेंटरमध्ये दिपक बडगुजर आणि पंकज जैन हे मॅनेजर म्हणून काम पाहतात. २४ फेब्रुवारीरोजी सेंटरचे मालक दत्तू माने हा नाशिकहून जळगावातील सेंटरवर आला. सायंकाळी महिला एकटी असतांना दत्तू माने याने महिलेकडून मसाज करून घेतला. त्यावेळी त्याने महिलेशी जबरदस्ती करून अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर उरलेला पगार देणार नाही अशी धमकी दिली. मॅनेजर दिपक बडगुजर आणि पंकज जैन यांनी देखील विनयभंग केला. त्यानंतर महिलेला कामावरून काढून टाकले. महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दत्तू लक्ष्मण माने , दिपक बडगुजर आणि पंकज जैन दोन्ही यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहेत .