जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रामेश्वर कॉलनीत एका किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणानेच दुकानातील ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा माल चोरुन नेला आहे, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत जावईगल्लीत नंदकिशोर भागवत शिंदे ( वय – ४३ ) हे राहायला आहे. त्यांचे रामेश्वर कॉलनीतच श्री समर्थ कृपा नावाने किराणा दुकान आहे. या दुकानात विशाल शरद पाटील या नावाचा तरुण कामाला होता, ५ फेब्रुवारी २०२३ ते १४ मार्च दरम्यान विशाल याने वेळावेळी किराणा दुकानातून तब्बल ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा चोरुन नेला, १४ मार्च रोजी सायंकाळी प्रकार समोर आल्यानंतर दुकान मालक नंदकिशोर शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन विशाल शरद पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक सुधीर साळवे हे करीत आहेत.