जामनेर ( प्रतिनिधी ) – शहरात नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली आहे
आज जामनेर नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली जामनेर शहरांमध्ये भुसावळ रोड. जळगाव रोड. पाचोरा रोड. तसेच जुना बोदवड रोड परिसरातील सर्व अतिक्रमणे हटवली जाणार आहेत जामनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली यावेळी जामनेचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला होता या सर्व मोहिमेवर जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे लक्ष ठेवून होते जामनेर शहरातील बऱ्याच अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण शांततेत काढून घेतले यावेळी जामनेर नगरपरिषद कर्मचारी व पोलीस कर्मचारी सहभागी होते.