रावेर ( प्रतिनिधी ) – येथील बहुचर्चीत वैयक्तीक शौचालय अनुदान घोटाळ्यात प्रभारी सहायक गटविकास आधिकारी आणि सेवानिवृत्त विस्तार अधिकार्यांना अटक करण्यात आली असून अजून काही संशयितांवर अटकेची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे.
रावेर पंचायत समिती अंतर्गत शौचालय अनुदानावर डल्ला मारून दीड कोटी रूपयांचा अपहार केल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुख्य सुत्रधार समाधान निंभोरे आणि सहायक लेखा सहायक लक्ष्मण दयाराम पाटील यांच्यासह इतरांना आधीच अटक करण्यात आलेली आहे.
या घोटाळ्यात काल रात्री प्रभारी सहायक गटविकास अधिकारी दीपक बाबूराव संदानशीव ( वय ५२ ) आणि सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दीनकर हिरामण सोनवणे ( वय ५८) यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या चौकशीतून अजून बरेच काही समोर येण्याची शक्यता आहे. अजून काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती देखील समोर आली आहे.