चाळीसगाव (प्रतिनिधी) – मेहुणबारे शहरात एका व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी जाऊन चौकशीला सुरूवात करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दगडू वामन गढरी (वय-४५) रा. मेहुणबारे, ता. चाळीसगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. मेहुणबारे गावातील गिरणा विद्यालयाजवळ दगडू गडरी यांचा अज्ञात व्यक्तीने गळ्यावर लोखंडी कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. हा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समजू शकले नाही. मानेवर सपासप वार करून मारेकरी पसार झाले आहे. घटनेची माहिती मिळल्यानंतर मेहुणबारे पोलीसांनी घटनास्थळी गेले आहे. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.