जळगाव ( प्रतिनिधी ) – येथे पहिले शासकीय होमिओपॅथिक कॉलेज मंजूर करवून आणल्याबद्दल जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ. रितेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. देवानंद कुलकर्णी, जिल्हा सहसचिव डॉ. मनोज विसपुते, चामुंडा माता होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. समीर साकळीकर, उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल पाटील, जामनेर तालुका होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ शेळके, सचिव डॉ. योगेश इंगळे तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स उपस्थित होते.