• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज अन् भगवान परशुरामाचा जयघोष…

"श्री परशुराम जन्मोत्सव २०२३" : समाजबांधवांच्या उत्साहात निघाली भव्य दुचाकी रॅली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील समस्त ब्राह्मण समाज तथा बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे “श्री परशुराम जन्मोत्सव २०२३” अंतर्गत आज रविवार दि. १६ एप्रिल रोजी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत महिला-पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत शहरात श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त वातावरण निर्मिती केली. दरम्यान, सकाळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५५ समाजबांधवांनी रक्तदान केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुभाषिक ब्राह्मण संघ श्री परशुराम जन्मोत्सव २०२३ साजरा करीत आहे. जन्मोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १६ एप्रिल रोजी संध्याकाळी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. महाबळ परिसरात छत्रपती संभाजी चौकात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. प्रसंगी ढोलताशांच्या गजरात भगवान परशुराम यांचा जयघोष करीत जल्लोष करण्यात आला. रॅलीत अग्रभागी फुलांनी सजविलेल्या जीपमध्ये भगवान परशुराम यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. प्रसंगी महिला-पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा करीत आकर्षक फेटे घालून लक्ष वेधून घेतले. दुचाकी रॅलीत समाजबांधवांनी भगवे ध्वज फडकवित उत्साह दाखविला.

रॅली महाबळ कॉलनी चौक, सागर पार्क परिसर, आकाशवाणी चौक, रिंग रोड, शिवतीर्थ चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे विद्यालय, नेताजी सुभाष बाबू चौक, बेंडाळे चौक, नेरी नाका या मार्गाने निघाली होती. मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते. मुख्य चौकात थंड पाणी, सरबत वाटप करण्यात आले. तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीतहि रॅलीचे स्वागत झाले. अखेर पांजरापोळ गोशाळा येथे रॅलीचा समारोप झाला.

प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्रनाथ मिश्रा, मिलिंद थत्ते, वास्तुविशारद नितीन पारगावकर, देवेंद्र भालेराव उपस्थित होते. त्यांनी समाजाला मार्गदर्शन करून भगवान परशुराम यांच्या कार्याविषयी सांगितले. रॅलीसाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर यांच्यासह पदाधिकारी, समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

रक्तदान शिबीरात ५५ जणांचे रक्तदान
समाजातर्फे रविवारी सकाळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर आकाशवाणी चौकातील दिवंगत बलदेव उपाध्याय फाउंडेशन या ठिकाणी घेण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिरास प्रारंभ झाला. शिबिरासाठी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अंमळकर, उद्योजक सुशील आसोपा, शासकीय कंत्राटदार सतीश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान करण्यासाठी समाजबांधवांनी सकाळी मोठा उत्साह दाखविला. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबीरात ५५ जणांनी रक्तदान केले.


 

 

Tags: #bahubhashik bramansangh newshttps://kesariraj.com/16-april-23-n-7/
Previous Post

घरमालक बांभोरीला ; चोरट्यांचा भरदिवसा उच्चभ्रू वस्तीत धुमाकूळ

Next Post

भुसावळ तालुक्यातील गोळीबार प्रकरणातील एक आरोपीस अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळ तालुक्यातील गोळीबार प्रकरणातील एक आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर
1xbet russia

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 11, 2026
बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास
1xbet russia

बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon