भुसावळ (प्रतिनिधी) – शहरात 21 वर्षीय युवकाच्या छातीवर वार करून खून केल्याची घटना खडका रोड भागात रविवारी दि. १३ रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, आज दि. १५ रोजी पुन्हा एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी शेख राशीद शेख मासुम यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, जुन्या भांडण्याचे कारणावरुन राशीद शेख यांचा मुलगा अल्तमश रशिद शेख (वय-21) यास चाकुने भोसकुन जिवे ठार मारले. या गुन्ह्यात आरोपी शेख समिर शेख युसुफ (वय-19), शेख शाहरुख शेख युसुफ (वय-27 दोन्ही रा.10 खोली रिंगरोड, भुसावळ), समिर शेख रेहमान शेख (वय-18, रा. 15 बंगला, भुसावळ) हे भुसावळ शहरातुन पळुन जात असताना त्यांना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले आहे. तर आज पुन्हा चौथा फरार आरोपी शेख आमिर शेख युसुफ (वय-18, रा.पंधरा बंगला भुसावळ) यास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांना मिळालेल्या माहितीवरून भुसावळ शहरातून सोमवारी दि. 14 रोजी रात्री 11 वाजता पंधरा बंगला भागातून ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो नि अनिल मोरे,-मंगेश गोटला, पो ना. रवींद्र बिऱ्हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, पो का विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, कृष्णा देशमुख यांनी केली आहे.