राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष
अभिषेक पाटील यांची माहिती
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – येथील महानगरपालीकेचा साफसफाईचा ठेका वॉटरग्रेस या कंपनीला दिला आहे. हि कंपनी मात्र त्यांच्या कर्मचार्यांना पीएफ देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे आयुक्त यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली होती. त्याची दखल घेत अजित पवार यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे आयुक्त यांना चौकशीचे आदेश दिले आहे.
महानगरपालीकेचा सफाई ठेका वॉटरग्रेस या कंपनीला 2023 पर्यंत प्राप्त झाला आहे. या ठेकेदाराच्या मार्फत सुमारे 400 सफाई कर्मचारी काम करत असून त्यांना पगारापोटी 490 रूपये प्रतिदिन मनपा मोबदला अदा करत आहे.परंतु वॉटरग्रेस कंपनीच्या अंतर्गत असलेले वॉटरग्रेसचे सफाई कर्मचारी यांच्या नावाने तंटपुज्या रकमेचा इपीएफ व इएसआयसी भरत आहे. यामुळे या कर्मचार्यांना पीएफ तसेच इएसआयसीचा कमी प्रमाणात लाभ मिळत नसल्याचा संशय महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. या सफाई कर्मचार्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र त्यावर काहीही कार्यवाही झाली नव्हती.अभिषेक पाटील याबाबतची ऑनलाईन तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे आयुक्त यांच्याकडे केली होती.
यानुसार मंगळवारी 15 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि कर्मचारी भविष्य निर्वाहाच्या आयुक्तांना चौकशी केल्याच्या सुचना दिल्या आहे.त्यामुळे वॉटरग्रेस कंपनी पुन्हा एकदा मनपात वादाच्या भोवर्यात सापडली आहे.