जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शाहु नगरातील रूग्णालयासमोर नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या इसमाची दुचाकी पार्किंगमधून अज्ञात चोरटयांनी लंपास केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नवनाथ बापुराव राऊत (वय-४५) रा. एमडीएस कांलनी, मेहरूण यांची पत्नी शोभा राऊत यांना शहरातील शाहु नगरातील रुग्णालयात दाखल केले होते. तत्पूर्वी त्यांनी त्यांची दुचाकी (एम.एच.१९ सी.सी.७३५९) हि रुग्णालयासमोर लावली होती. रविवारी सकाळी ७.३० वाजता दुचाकी रुग्णालयासमोर आढळून आली नाही.त्यांनी शहरात दुचाकीचा शोध घेतला.ती मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.