अमळनेर (शहर प्रतिनिधी) – राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे व तालुकाध्यक्ष रमेश पाटील नेतृत्वाखाली अमळनेर येथे केंद्र सरकारने किसान विरोधी केलेल्या कायद्याच्या विरोधात अमळनेर तहसिलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले .


निवेदनात ,दि ५/६/२०२० रोजीचा केंद्र सरकार चा कायदा शेतकरी हिताचा नसून पुंजीपती , व्यापाऱ्यांच्या जास्त हिताचा आहे. त्यामुळे यामुळे संपूर्ण देशात शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चा मार्फत दि. १४ रोजी संपूर्ण देशात तिसऱ्या शृंखलातील देशव्यापी आंदोलन संपूर्ण भारतातील तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने किसान विरोधी अध्यादेश पारित केलेले आहे. किसान विरोधी कायदे वापस घ्यावे म्हणून निवेदन देण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे व तालुकाध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष नाविदभाई शेख, शहराध्यक्ष गुलाबनबी, नगरसेवक श्याम पाटील, छत्रपती क्रांती सेनाचे तालुका अध्यक्ष दयाराम पाटील आदिं उपस्थित होते.







