गुढे.ता.भडगांव (प्रतिनिधी) – शासनाचा महत्वकांक्षी समजला जाणारा हायब्रीड अँन्युटी प्रकल्पांतर्गत एंरडोल-येवला राज्यमार्ग क्रमांक २५ या रस्त्यांंचे रुंदीकरणासह नवीन रस्ता तयार करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु असून या रस्त्याचे काम एकसारखे न वाटता कुठे-कुठे कमीजास्त दिसत असल्याची ओरड, तक्रार केली जात असून याकडे प्रशासनाचे व ठेकेदाराचे दुर्लक्ष झाले आहे.सदरील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा याबाबत ग्रामस्थांसोबत उपोषणाला बसण्याचा इशारा माजी जि.प.सभापती विकास पाटील यांना दिला आहे.
गांव व परिसरासाठी दळणवळणासाठी अतिशय महत्वपूर्ण समजला जाणारा राज्यमार्ग क्रमांक २५ हा मेहुणबारे,जामदा,बहाळ,रथाचे बहाळ,गुढे,कोळगाव,खेडगांव,वडजी,वाक या मोठ्या बागायत,फळबागायत गावांवरून गेला आहे.
सा.बां.विभाग भडगांव हद्दीतील म्हसाल्डी नाला ते पथराड फाटा या रस्त्या दरम्यान ठराविक लोंकांचे अतिक्रमण जसेच्या तसे का?ठेवण्यात आले आहे.सदर रस्ता स्टेट हायवे असून तो ३० मीटरचा मोठा रस्ता आहे.या रस्ताच्या मध्यभागापासून दोन्ही बाजुने१५,१५मीटरचे मोजमाप झाले आहेत तरीही काही ठिकाणी या रस्त्या दरम्यान अतिक्रमण असून देखील हे अतिक्रमण का? काढले जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.उपोषण बसण्यापूर्वी अतिक्रमण काढले न गेल्यास या बाबतीत संबंधीत विभागाचे मुख्य अभियंता,सा.बां सचिव, मंत्री, यांच्याकडे रीतसर तक्रार केली जाईल याकडे अधिक्षक अभियंता पी.पी.सोनवणे यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.तसेच सदर या रस्त्या दरम्यान काम अतिशय कासवगतीने होत असल्याने या रस्त्यावर मोठी समस्या निर्माण झाल्याने वाहनधारक व प्रवासी त्रस्त झाले आहेत.









