गुढे.ता.भडगांव (प्रतिनिधी) – नावरे-दलवाडे चार कि.मी.रस्त्यावर ठिक ठिकाणी मोठ मोठी खड्डे पडले असून या रस्त्याची फारच मोठी दुरावस्था झाली असून हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी युवासेना तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊसाहेब पाटील (गुढे) यांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.


नावरे-दलवाडे या चार कि.मी.डांबरीकरण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याने जाण्या – येण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी समस्या,अडचण निर्माण झाली आहे.या चार कि.मी.रस्त्या दरम्यान गुढे,सावदे,दलवाडे,नावरे,बांबरूड,गोंडगांव येथील गावातील या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा शेतशिवार असून हा संपूर्ण शेतशिवार बागायत,फळबागायत,भाजीपाला आदीचे भरघोस उत्पन्न घेतले जाते.या शिवारातून दररोज लिंबू,भाजीपाला,केळीच्या मालाची दररोज बाजारपेठत विक्रीसाठी शेतमाल नेला जात असतो.तसेच दसऱ्यासणानंतर ऊस गळीत हंगामात पुढील पाच महिने ऊसाच्या टँकद्वारे ऊसाच्या मालाची मोठी वहातुक होत असते म्हणून हा रस्ता या गावातील शेतकऱ्यांना फार सोयीचा व गरजेचा ऐकमेव रस्ता असल्याने हा रस्ता आज फारच खराब झाला आहे.शेतकरी दररोज या रस्त्याने आता उबगले आहेत म्हणून हा रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी राहुल पाटील व या शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.







