जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील अजिंठा चौकातील आर.सी. बाफना कंपनी समोरून एकाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली आहे. याबाबत शुक्रवारी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून दिलेली माहिती नुसार, संतोष मंगळ पाटील (वय-५९) रा. द्वारका नगर, जुनाखेडी रोड, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा राहायला आहे. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान त्यांच्या घरासमोर (एमएच १९ एआर ३५५८) क्रमांकाची दुचाकी लावली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरूननेली आहे. त्यांनी दुचाकीचा शोध सर्वत्र घेतला परंतु दुचाकी कुठेही आढळून आले नाही. अखेर त्यांनी शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.