पाचोरा (जळगाव) – पाचोरा येथे अटल भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन बोलत्यांना म्हणेल की, गेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे संदर्भीत झालेली चूक मी मान्य करतो.परंतु पुढील काळात पाचोरा तालुका भाजपाच्या सत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असेल.अमोल शिंदे हेच आमदार असतील. कारण माझा शब्द मी खरा करतो व मी सांगितलेला आकडा ही फिट असतो.
भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे अध्यक्षस्थानी होते. प्रथम भडगाव येथील कार्यालयाचे उद्घाटन करून ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पाचोरा येथे भडगाव रोड भागातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील सतीश शिंदे यांच्या व्यापारी संकुलातील कार्यालयाचे उद्घाटन झाले. तेथेच जाहीर सभा झाली. याप्रसंगी खासदार उन्मेश पाटील, विधान परिषदेचे आमदार चंदू पटेल, आमदार मंगेश चव्हाण, अमोल शिंदे, अमोल पाटील (भडगाव), डी. एम. पाटील, सदाशिव पाटील ,रमेश वाणी, माजी सभापती बन्सीलाल पाटील, पोपट तात्या भोळे, नगराध्यक्ष करण पवार (पारोळा), जि. प. सदस्य मधुकर काटे, सभापती वसंत गायकवाड आदी उपस्थित होते.








