पारोळा (प्रतिनिधी) – आजकाल माणूसकी कमी कमी होत असताना पारोळा येथील नामदेव बाबा माळी यांनी समाज सेवेचा वसा हाती घेतलेला आहे. कोरोनाकाळात त्यांनी गोरगरिबांना अन धान्य , किराणा साहित्य वाटप करत आधार दिला होता. तर कुटीर रुग्णालय मधील कंत्राटी कामगारांना आर्थिक सहाय्य देत मदत केली होती.
किराणा माल वाटप, कुटीर रुग्णालयाला स्वच्छता साहित्य वाटप, रुग्णांना फळ ,मास्क, सॅनिटायझरचे वाटप, असे विविध सामाजिक उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबविले आहेत. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची परिस्थितीची जाणीव ठेवत नामदेव बाबा यांनी शहरातल्या गरिबांना दिवाळीचे फराळ व गोड पदार्थ वाटप करत गरिबांची दिवाळी गोड केली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत गोरगरिबांची सेवा करणाऱ्या समाजसेवक नामदेव बाबा माळी यांचे सर्वदूर कौतुक होत आहे.








