जळगाव (प्रतिनिधी) – येथील काँग्रेस भवन समोरील वासुपूज्य जैन मंदिरात सुमार गांधी परिवारातर्फे सोमवार दि. १६ नोव्हेंबर रोजी द्वार उदघाटन सकाळी ६ वाजता केले जाणार आहे.
दिवाळी पाडव्यानिमित्त तसेच कोरोनामुळे गर्दी होऊ नये यासाठी मंदिरे आठ महिन्यानंतर उघडत आहेत. त्यानिमित्ताने वासुपूज्य जैन मंदिरात सुमीरा गांधी परिवारातर्फे आज द्वार उदघाटन केले जाणार आहे. यावेळी मंदिरात पूजा-अर्चा करून ईश्वराला कोरोनाचे संकट लवकर निवारण करण्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. भाविकांनी उपस्थिती देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सुमीरा गांधी परिवारातर्फे संजय, अजय, रितेश गांधी यांनी केले आहे.








