जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातून तब्बल १५ मोटारसायकली चोरणाराला पोलीस कोठडी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केल्यानंतर त्याला ३ दिवस पोलीस कोठडीत तेहवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत .
जळगावातील मुख्य बाजारपेठ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे . याच भागात मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी होत असल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते. दिवाळीच्या गर्दीचा फायदा चोरटे घेत होते. पो. नि. विजयकुमार ठाकूरवाड यांनी प्रदीर्घ अनुभवातून ३ पथके तयार करून त्यांच्यावर बारकाईने सलग १२ ते १४ तास संशयितांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवली होती. जवळपास १ महिना या पथकांनी संशयितांचा माग काढला. त्यानंतर काल संशयित चोरीसाठी पहाटे येणार असलायची माहिती पो. ना. भास्कर ठाकरे व पो. कॉ . प्रणेश ठाकूर यांना मिळाली होती. पहाटे ७ वाजता या आरोपीला गोलाणी मार्केट भागात पो. हे. कॉ. विजय निकुंभ, उमेश भांडारकर , संतोष खवले , पो. ना. प्रफुल्ल धांडे , राजकुमार चव्हाण , किशोर निकुंभ , पो कॉ तेजस मराठे , योगेश इधाटे यांच्या पथकाने सापळा रचून या इब्राहिम मुसा तांबोळी ( वय २६ , रा – तोंडापूर , ता – जामनेर ) या आरोपीला अटक केली . त्याने १५ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ गुन्हे व जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ गुन्हा त्याच्या चौकशीत उघडकीस आला आहे १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत त्याच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.