एरंडोल ( प्रतिनिधी ) – शेतीच्या वादातून केलेल्या हाणामारीत तरूणाचा मृत्यू झाला होता या हत्याकांडातील चार संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
एरंडोल येथे १२ मे रोजी शेतीच्या वादावरून उमेश आबा महाजन (वय २८) या तरूणाचा खून झाला होता आबा भगवान महाजन यांचा त्यांचे भाऊ सुरेश, तुकाराम आणि मगन यांच्याशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आबा महाजन यांना मारहाण करत असल्याचे पाहून त्यांचा मोठा मुलगा उमेश आल्याचा राग आल्याने सुरेश महाजन, तुकाराम महाजन, मगन महाजन, तुकारामचा मुलगा मनोज आणि पत्नी उषा बाई आणि इतरांनी आबा महाजन आणि उमेश महाजन यांना बेदम मारहाण केली. उमेशला गुप्तांगावर लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला.
मयताची आई सुनिता यांच्या फिर्यादीवरून तुकाराम महाजन, मनोज महाजन, सुरेश महाजन, अनिल महाजन, उषाबाई महाजन ( सर्व रा. एरंडोल ) यांच्याविरोधात एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला तुकाराम महाजन, मनोज महाजन, सुरेश महाजन व अनिल महाजन यांना एरंडोल येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधिशांनी सर्व संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.