जळगाव ( प्रतिनिधी ) – दारूचे बिल भरण्याच्या वादातून तरूणावर चाकूहल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना सुप्रिम कॉलनीत घडली एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय शांताराम दांडगे हा आईवडील यांच्यासह सुप्रिम कॉलनीत वास्तव्याला आहे. १४ मे रोजी दुपारी सुप्रिम कॉलनीतील देशी दारूच्या दुकानात अक्षय दांडगे आणि त्याचा मित्र प्रभाकर चांदेलकर हे दारू पिण्यासाठी गेले. दोघांनी दारू पिल्यानंतर प्रभाकरने अक्षयला दारूचे बिल भरण्यास सांगितले. त्यावर अक्षयने माझ्याकडे दारूचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने प्रभाकर चांदेलकर याने आरडाओरड केली. त्यावेळी दारूच्या दुकानासमोर अक्षयचा काका गणेश दांडगे हे रिक्षा घेवून प्रवाशांची वाट पाहत होते. अक्षय दारूच्या दुकानात गेला आहे हे गणेश दांडगे यांना माहित होते. गणेश दांडगे त्या दुकानात गेले प्रभाकर दारूचे बिल भरण्यासाठी अक्षयला जबरदस्ती करत होता. पैसे भरले नाही म्हणून प्रभाकरने त्यांच्या हातातील चाकूने अक्षयवर वार करून घटनास्थळाहून पसार झाला. जखमी अक्षयला त्याचे काका गणेश दांडगे यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले गणेश दांडगे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रभाकर चांदेलकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहेत.