जळगाव (प्रतिनिधी) – निमखेडी शिवारातील एक महाविद्यालयीन तरुणी कॉलेजला जाते सांगून घराबाहेर पडली. मात्र ती घरी न परतल्याने तिच्या आईने हरवल्याची तक्रार जळगाव तालूका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
निमखेडी शिवारात असलेल्या एका कॉलनीतील रहिवासी असलेल्या परिवारातील १८ वर्षीय तरुणी महाविद्यालयात जाते असे सांगून रविवारी १४ रोजी सकाळी ११ वाजता बाहेर पडली. संध्याकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र ती मिळून न आल्याने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून नोंद करण्यात आली आहे. तपास पोना ज्ञानेश्वर माळी करीत आहे.