भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील गंगाराम कॉलनीत चार जनावरांनी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोचालकाविरोधात वरणगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, वरणगाव शहरातील गंगाराम नगरातून सायंकाळी (एमएच ०४ एमजे ४१२१) क्रमांकाच्या मालवाहू टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त चार बैलांची वाहतूक करतांना वरणगाव पोलीसांना आढळून आले. वाहनाची चौकशी केली असता चारही जनावरे हे कत्तलीसाठी नेत असल्याचे समोर आले. दरम्यान चालक वाहन सोडून पळ काढला असून वरणगाव पोलीसांनी वाहन ताब्यात घेवून जनावरांची सुटका केली. याप्रकरणी संशयित आरोपी टेम्पोचालक शेख कलीम शेख आयुब (वय-३२), रा. मातंगवाडा, सावदा, ता.रावेर याच्या विरूध्द वरणगाव पोलीस ठाण्यात पोलीस नाईक मजहर खान पठाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि सुनिल वाणी करीत आहे.







