जळगाव (प्रतिनिधी) – पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या शिफारशीनुसार जळगाव शहर व तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली. या समितीवर महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून जळगाव शहरातील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जळगाव महानगराध्यक्षा श्रीमती शोभा किसन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव शहर व तालुक्यातील संजय गांधी निराधार गरजू लाभार्थ्यांना शोभा चौधरी नक्की शासन दरबारी न्याय मिळून देणार असल्याचे त्या ‘केसरीराज’शी बोलतांना म्हणाल्या.







