जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील देवेंद्रनगरातील रहिवासी गृहस्थाला मध्यप्रदेशातील छिंदवाडा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला लावून देतो असे सांगत एका दाम्पत्याने चक्क सोडेतीन लाखात फसवणुक केली आहे.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील वैद्यकीय महाविद्यालयात तुम्हाला क्लार्क म्हणुन कायम नोकरीला लावून देण्याचे आमीष देत उमेश राजेंद्र प्रसाद चौरसिया वय-३७,रा.देवेंद्र नगर जळगाव यांची ३ लाख ५० हजार रुपये फसवणुक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील शिवशंकर लखन जवरकर, नितु जवरकर रा.दोन्ही चांदामोटा वार्ड क्र १० क्रांती चौक छिंदवाडा असे फसवणुक करणा-या पती-पत्नीचे नाव आहे. जळगावी येवु या कुटूंबाने उमेश चौरसिया यांच्याकडून साडेतीन लाख रुपये रोख घेवुन नोकरीची खात्री दिली. थोड्या दिवसांनी चौरसिया यांच्या मोबाईलवर बनावट नियुक्तपत्र पाठवुन संबधीतांनी आणखी दिडलाखांची मागणी केली. मात्र, चौरसिया यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केल्यावर फसवणुक झाल्याचे निदर्षनास आल्याने त्यांनी पेालिस ठाणे गाठून तक्रार दिली. चौरसिया यांच्या तक्रारीवरुन शिवशंकर व नितू जवरकर यांच्या विरुद्ध जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यता आला आहे. पुढील तपास पो.नि. अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रदिप चांदेलकर करीत आहे.