• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शहरात डांबरी रस्ते करताना प्लास्टिकचा उपयोग होणार, फिस्ट फाऊंडेशन, इनरव्हील क्लबचे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात नवीन रस्ते तयार करण्याची कामे गेल्या अनेक वर्षापासून झालेली नव्हती. त्यातच अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची पार वाट लागली. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघातात काहींना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे दुखणे जडले. जळगाव शहरात नुकतेच रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली ही जळगावकरांसाठी चांगली बाब आहे. शहरातील रस्ते तयार करताना डांबरसोबत प्लास्टिकचा देखील उपयोग करावा, अशी मागणी फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना करण्यात आली. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्यांसाठी पुढील निविदा प्रक्रिया राबविताना त्यात प्लास्टिक वापराची अट नमूद करण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या.

जळगाव शहरात डांबरी रस्ते करताना ते गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ होण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार डांबरसोबत प्लास्टिक बिटूमीन्स देखील त्यात वापरावे, अशी मागणी करण्यासाठी मंगळवारी फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची भेट घेतली. प्रसंगी फिस्ट फाऊंडेशनचे सकिना लहरी, चेतन वाणी, कल्पक सांखला, लक्ष्मी सांखला, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नेहा संघवी, इशिता दोशी, नफिसा लहरी आदी उपस्थित होते.

फिस्ट फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, शहरातील रस्त्यांचे काम करताना ते गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मक्तेदारावर जबाबदारी करणारे एक परिपत्रक काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे. शहरात आता नव्याने तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला ते लागू करण्यात यावे. रस्ते किमान पुढील १० वर्ष टिकावे यासाठी आताच कामाच्या निविदेत आवश्यक तो बदल करावा, रस्त्यांची कामे पूर्ण होण्यापूर्वी त्याठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती, ड्रेनेज, इतर केबल संदर्भातील कामे पूर्ण झालेली आहेत की नाही याची खात्री मनपा प्रशासनाकडून करवून घेण्यात यावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा रस्ता खोदकाम करण्याची आवश्यकता भासणार नाही. जळगाव शहर विकासाच्या टप्प्यावर येऊन ठेपले असून शहरात प्रायोगिक तत्वावर एक रस्ता प्लास्टिक वेस्टचा उपयोग करून तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड म्हणाल्या, उदगीर येथे असताना त्यांना प्लास्टिक वेस्टपासून रस्ता तयार करण्याचा उपक्रम राबविला होता. जळगावात देखील असा उपक्रम राबवता येऊ शकतो. पर्यावरण संवर्धनासाठी जळगाव मनपा प्रयत्नशील असून अनेक उपक्रम विविध संस्थांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. जळगावात डांबरी रस्त्यांच्या नवीन कामांची निविदा प्रक्रिया राबविताना त्यात प्लास्टिकचा उपयोग करण्याचे नमूद करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी अभियंत्यांना दिल्या. फिस्ट फाऊंडेशनच्या सदस्यांशी पुन्हा भेटत चर्चा करण्याचे देखील मनपा आयुक्त म्हणाल्या.


 

 

Tags: #fist fondetion news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

Next Post

नोकरीचे आमीष दाखवुन साडेतीन लाखांत फसवणुक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर मध्ये बनावट पतंजली वेबसाइटवरून ३३ हजारांचा गंडा

नोकरीचे आमीष दाखवुन साडेतीन लाखांत फसवणुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon