जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील तरूणीला व्हॉटस्ॲपवर अश्लिल मॅसेजेस पाठवून विनयभंग केला. सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील एका भागात ३६ वर्षीय तरूणी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ती उदरनिर्वाह करते. १३ जुलै रोजी रात्री जेवण करून झोपलेली असतांना तिच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अनोळखी नंबरवरून तिला मॅसेजेस पाठविले. नंतर अश्लिल फोटो व्हॉटसॲपवर पाठविले. १४ जुलै रोजी तरूणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो नि लिलाधर कानडे करीत आहेत .