जळगाव ( प्रतिनिधी ) – हॅलो गाइज, आज मैं आत्महत्या करनेवाला हूं, प्लीज मुझे फॉलो करे, कमेंट करे, ओके बाय, जय बाबा टकाटक’ हा नऊ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल करत २२ वर्षीय तरुणाने गळफासाने आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे तरुणाच्या कुटंुबीयांनाही धक्का बसला आहे.
धीरज शिवाजी काळे (वय २२, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे दुसरीपर्यंत शिक्षण झालेला धीरज वडिलांसोबत फर्निचर काम करत होता. गुरुवारी सकाळी तो नियमितपणे वडिलांसोबत स्टेट बँक कॉलनीतील एका बंगल्यात फर्निचर काम करण्यासाठी गेला. थोडा वेळ काम केल्यानंतर १०.३० वाजेच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. वडील दुसऱ्या खोलीत काम करीत होते. दुपारी डबा खाण्यासाठी वडिलांनी त्याला आवाज दिला. त्यावेळी त्याने आत्महत्या केली असल्याचे लक्षात आले.