जळगाव.( प्रतिनिधी ) – वडील आणि भावाविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करून आरोपपत्र लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात तक्रादाराकडून १५ हजारांची लाच घेताना मारवाड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक भास्कर चव्हाण याला आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले
अमळनेर तालुक्यातील .पाडळसे येथील ४५ वर्षीय तक्रादाराच्या भावाच्या आणि वडिलांच्या विरोधात मारवाड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 105/2021, भा.द.वि. कलम-354,448 अन्वये गुन्हा दाखल आहे या गुह्यात मदत करून चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात आरोपीने पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १५,०००/-रुपये लाचेची मागणी केली व लाचेची रक्कम स्वतः जुनी पोलीस लाईन, अमळनेर येथे पंचासमक्ष स्वीकारली म्हणून पोलीस नाईक भास्कर चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने , प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सतीश भामरे , पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील व .सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, जनार्धन चौधरी, पो.कॉ.महेश सोमवंशी, .नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांनी सापळा यशस्वी करून कारवाई केली.