जळगाव ( प्रतिनिधी ) – पाटबंधारे विभागातील कर्मचारी सुनिल धर्मा शिंदे ( वय ४५ ) रा. वाघ नगर जळगाव यांनी काल रात्री दिड वाजेच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. तापी पाटबंधारे विभागील कर्मचारी सुनिल शिंदे यांनी जळगाव शहरातील काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. परंतू काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्या कडून दहा ते पंधरा टक्के व्याजाने पैसे वसुल केले. एका महाभागाने दहा हजाराचे एक लाख वसुल केले. व्याजाचा धंदा करणाऱ्या लोकांच्या तगादयाला कंटाळून सुनिल शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.