जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण परिसरात राहणाऱ्या तरूणाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आले. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.
याबाबत माहिती अशी की, कुणाल मैथुलाल पाली वय-२७ रा. यवतमाळ ह.मु.महादेव मंदिराजवळ मेहरूण परिसरात विशाल नामदेव पाटील यांच्या शेतातील जागा जकशन कंपनीला भाड्याने दिली आहे. त्याठिकाणी कुणाल हा वॉचमन म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून कामाला होता. या तरूणाने मेहरूण परिसरातील एका शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. मालक विशाल नाईक यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक महेंद्र गायकवाड, पोहेकॉ हेमंत पाटील तपास करीत आहे.