• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजस्थानात कॉंग्रेस सरकारने विश्‍वासदर्शक ठराव 125 विरूद्ध 75 मतांनी जिंकला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2020
in भारत
0

जयपुर (वृत्तसंस्था) – राजस्थानातील राजकीय अस्थिरता आज झालेल्या विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानानंतर संपुष्ठात आली. हा ठराव अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने 125 विरूद्ध 75 मतांनी जिंकला. आजच्या या आकडेवारीनुसार बंडखोर 19 आमदार जरी सरकारच्या विरोधात गेले असते तरी हे सरकार तरलेच असते हे स्पष्ट झाले आहे. आज या ठरावावर विधानसभेत जोरदार गरमागरमी झाली. तथापि आता यापुढे एकदिलाने राज्यातील जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही सरकारच्या वतीने देण्यात आली.

आजच्या या ठरावावर सचिन पायलट यांचेही चमकदार भाषण झाले. पण त्यात त्यांच्या तिरकस उद्‌गारांनी अद्याप सारे काही आलबेल नाही असा निष्कर्ष काही राजकीय निरीक्षकांनी काढला आहे.
सचिन पायलट यांच्याकडील उपमुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आज सभागृहात बसण्यासाठी दुसरी जागा देण्यात आली. ही जागा विरोधकांच्या बाजुला दुसऱ्या ओळीत देण्यात आली आहे. त्याचा संदर्भ देत पायलट यांनी नमूद केले की मला सरहद्दीवरील जागा देण्यात आली आहे. पण नेहमी शूर योध्यालाच सरहद्दीवर पाठवले जाते त्याच हेतूने मला येथे ही जागा देण्यात आली असावी अशी टिप्पणी त्यांनी केली.

आजच्या कॉंग्रेस ऐक्‍याचे श्रेय त्यांनी गेहलोत यांना न देता दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनाच दिला. आजचा विश्‍वास दर्शक ठराव हा सत्त्याचा आणि लोकांचा विजय असेल तसेच कॉंग्रेस आमदारांच्या एकतेचाही तो विजय असेल असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी प्रत्यक्ष मतदाना आधी प्रसारीत केलेल्या संदेशात नमूद केले होते.

आज सभागृहात बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राज्यात करोनाचे मोठे संकट असताना भाजपने राज्यात राजकीय अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला. राजस्थानातील लोकनियुक्त सरकार पाडणे हाच भाजपचा एकमेव डाव होता पण तो कॉंग्रेस आमदारांच्या ऐक्‍यातून हाणून पाडण्यात आला आहे असे ते म्हणाले.

या चर्चेला सुरूवात करताना कॉंग्रेसचे शांतीकुमार धारीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा गौरव करून त्यांनी भाजपला धडा शिकवला आहे असे विधान केले. आम्ही भाजपला येथे गोवा किंवा मध्यप्रदेश सारखा प्रकार करण्यापासून रोखले, मोदींची मोडस ऑपरेंडी येथे फेल गेली असे ते म्हणाले.

कॉंग्रेस मध्ये विलीन झालेल्या बहुजन समाज पक्षाच्या सहा आमदारांनी सरकारच्या बाजूनेच मतदान केले. या सभागृहात भाजपचे 72 सदस्य असून त्यांना अन्य तीन अपक्षांचा पाठिंबा आहे. आजच्या विजयामुळे सरकारला पुढील सहा महिने तरी कोणताहीं धोका नाही. कारण त्या अवधीत सरकारच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणता येत नाही.


 

 

Previous Post

गिरीष महाजनांच्या कोविड 19 सेंटरमध्ये अभिनव ध्वजारोहन

Next Post

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतची सुनावणी लांबणीवर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतची सुनावणी लांबणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश
1xbet russia

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
1xbet russia

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जैन कंपनी

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon