पाचोरा (प्रतिनिधी) – श्री एच.बी.संघवी हायस्कूल खेडगाव नंदीचे येथे 15 ऑगस्ट ध्वजरोहण कार्यक्रम सोशल डिस्टेंसिंगचे पालन करुन उत्साहात साजरा.
श्री एच .बी.संघवी हायस्कूल खेड्गाव नंदी येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन सोशल डिस्टनसिंग व मास्क लावुन शालेय कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब श्री.ब्रिजलाल हरकचंद संघवी व आण्णासाहेब श्री. पंढरीनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री. एल.एस.शिंपी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यावर शाळेतील कोविड ड्यूटी असलेल्या शिक्षकांचा पोलीस सेवा संघटना, जळगाव येथील जिल्हाध्यक्ष श्री. भावेश पी.ठाकुर आणि शहर अध्यक्ष श्री अतुल बोंडे व पोलीस सेवा संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा श्रीमती.शितल जडे यांच्या हस्ते कोविड योद्धे शिक्षकांचा पोलीस सेवा संघटनेचे सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.








