चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्याच्या सीमांसह घरोघरी जाऊन कोरोना संशयितांच्या तपासण्या करा अशी मागणी समभुज सेनेने केली आहे . यासंदर्भात प्रशासनाकडून लवकरात लवकर याबाबत निर्णय न घेतला गेल्यास संभाजी सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा लक्ष्मण शिरसाठ यांनी दिला आहे .

चाळीसगाव तालुक्यात बाहेरून येणाऱ्या एन्ट्रीज (प्रवेश) ठिकाणी औरंगाबादप्रमाणे औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी राबवलेला अँटीजन टेस्टचा पायलट प्रोजेक्ट (पांडे पॅटर्न) चाळीसगाव तालुक्यात राबविणे गरजेचे झाले आहे. कारण चाळीसगाव तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस भयंकर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
बहुतांश लोक खाजगी हॉस्पिटल्समधून ट्रीटमेंट घेत असल्याने खरी आकडेवारी समोर येत नाही, सध्याच्या परिस्थितीत जे कोरोना बाधित लोक आहेत. नातेवाईक यांची भयंकर मोठ्या प्रमाणात धावपळ आणि हाल होत आहेत, म्हणून अँटीजन टेस्ट घेणे गरजेचे आहे.
लवकरात लवकर चाळीसगाव तालुक्यातील सर्व एन्ट्रीच्या ठिकाणी तसेच प्रत्येक दुकानदाराची, भाजीपाला विक्रेत्यांची, दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची आणि प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन टेस्ट करणे गरजेचे आहे अन्यथा येणाऱ्या काळात चाळीसगाव हा कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरेल.
लवकरात लवकर याबाबत निर्णय न घेतल्यास संभाजी सेना तीव्र आंदोलन करेल. प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी जिल्हाधिकारी (जळगाव) यांना दिलेले आहे. या निवेदनाच्या प्रती आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव यांना पाठविण्यात आलेल्या आहे.







