जळगाव शहरातील निवृत्ती नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील निवृत्ती नगर येथील १४ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वेदांत पंकज नाले (वय १४, रा. निवृत्तीनगर, जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. इयत्ता आठवीच्या वर्गात तो शिकत होता. वेदांतचे वडील जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले हे निवृत्तीनगरात पत्नी व मुलासह राहतात.(केसीएन) शनिवारी दि. २ नोव्हेंबर रोजी वेदांत याने रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरामध्ये स्कार्पने गळफास घेतला.त्याच्या आईला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तात्काळ त्याला शेजाऱ्यांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
तेथे उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी साडे बारा वाजता वेदांतची प्राणज्योत मालवली. त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, वेदांतच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.