जळगाव (प्रतिनिधी)- कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परिक्षा फॉर्म ऑनलाइनची दि. १५ सप्टेंबर शेवटची मुदत असून सदर फॉर्म भरण्याची मुदतची वाढ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा महानगर सचीव अँड. कुणाल पवार यांच्याकडे कैफियत मांडली होती. दरम्यान, फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे वेबसाईट प्रॉब्लम देत आहे. याबाबत कुलसचीव यांच्याशी या विषयावर भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली असता, फॉर्म भरण्याची मुदत वाढवून मिळावी अशी विनंती केली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचण येत असेल किंवा वेबसाईट प्रॉब्लममुळे फॉर्म भरला गेला नाही त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. व फॉर्म भरण्यासाठी आंम्ही मदत करु असे आवाहन अँड. कुणाल पवार, भुषण संजय भदाने, युवती जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कल्पिता पाटील यांनी केले आहे.