श्रीनगर (वृत्तसंस्था) – जम्मू काश्मीरातील पुलवामा येथे सुरक्षा पथकावर दहशतवाद्यांवर पुन्हा एक हल्ला केला. पण सुदेैवाने त्यात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. सायंकाळी पावणे सहाच्या सुमाराला दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफल्सच्या पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
तथापि त्याला जवानांनी लगेच प्रत्युत्तर देणे सुरू केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. मात्र जादा सुरक्षा कुमक मागवून या परिसराची नाकेबंदी करण्यात आली.
हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.