जळगाव (प्रतिनिधी) अंध, दिव्यांग व गरजू नागरिकांना दिवाळीनिमित्त तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील सामाजिक कार्यकर्ते पुनमचंद श्रावण बारी यांनी आज शनिवारी १४ रोजी सकाळी फराळ व मिठाई वाटप करण्यात आली.


यावेळी शिरसोलीचे माजी उपसरपंच शेनफडू नामदेव पाटील, केसरीराजचे संपादक भगवान सोनार, संजय सूर्यवंशी, बाळकृष्ण सुदाम मराठे,माजी सरपंच अर्जुन काटोले, अनिल लोहार, दयानंद चव्हाण, योगेश फुसे, रवींद्र सोनवणे, भगवान पाटील, जगन मराठे, उपस्थित होते. यावेळी अंध, दिव्यांग यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. वंचित लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही, आपण दखल घेतली म्हणून त्याचे आभार मानण्यात आले.
यावेळी शिरसोलीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जय महाकाल मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी विठ्ठल अस्वार, बळीराम बारी, नाना पाटील, राकेश चौधरी, जयेश चौधरी, निवृत्ती महाजन, चंद्रभान बारी आदींनी परिश्रम केले.







