मुंबई (वृत्तसंस्था) – वडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना काल पोलिसांनी अटक केली आहे. रवी राणा यांचा आजचा दिवसरही कारागृहातच जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध, असं ट्वीट फडजणवीस यांनी केलं आहे. आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली काल रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी रवी राणा आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

‘शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो’, अशा शब्दात रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला आहे.
अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, लॉकडाऊनच्या काळात आलेलं वीज बिल माफ करा या मागणीसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 2 तास अडवून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत हे आंदोलन मोडून काढलं. आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्यानं आम्हीही दिवाळी तुरुंगात साजरी करु, असा इशारा रवी राणा यांनी सरकारला दिला होता.
आमदार रवी राणा आणि 18 शेतकऱ्यांवर तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यामुळे रवी राणा यांच्यासह इतर 18 शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागली.







