जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सेंट्रल फुले मार्केटमधील गोळ्या, बिस्किटांच्या दुकानाला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
फुले मार्केटमधील ग्राऊंड फ्लोअरला असलेले न्यू साई कृपा स्विट्स नावाच्या दुकाना रविवारी रात्री अचानक आग लागली या आगीत लाखो रूपये किंमतीचे गोळ्या, बिस्किट जळून खाक झाली आहे. फुले मार्केटमधील काही नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी महापालिकेच्या अग्निशामन विभागाला माहिती दिली. अग्निशामन विभागाचे देविदास सुरवाडे, रोहीदास चौधरी, संतोष तायडे, भगवान पाटील यांनी घटनास्थळी दाखल होवून या पथकाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, दुकानमालकासह इतर व्यापार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.