पाचोरा ( प्रतिनिधी ) – सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ओझर, ता. पाचोरा येथील रहिवाशी किशन पंडित सोनवणे (वय-२७) या शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणाला कंटाळुन घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना घरात कोणीही नसतांना झाल्याने सोमवारी १४ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. वृद्ध आई, पत्नी व मुली बाहेरगावी गेलेले असल्यामुळे किशन सोनवणे हे घरी एकटेच होते. अतिशय होतकरू व मन मिळावु स्वभाव असलेले किशन सोनवणे हे आपल्या नावे असलेली एक बिघा शेती सोबतच बाजार समितीमध्ये हमालीचे ही काम करायचे. त्यांच्या अशा अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असुन मयत किशन सोनवणे यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुली, एक लहान भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.