जळगाव ( प्रतिनिधी ) – कुरंगी ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडीत सहभागी भाविकांचे स्वागत दिंडीच्या प्रस्थानप्रसंगी कुरंगी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील व कुरंगीच्या ग्रामस्थांनी केले . उमाळा, धानवड, चिंचोली गावातील वारकरी यांच्यासह देवदास कोळी, कैलास बिराडे , जनार्दन पाटील ( धानवड) , सुभाष पाटील, मोहन सोनवणे , अरुण पाटील , निवृत्ती वाघ व असंख्य भाविक यावेळी उपस्थित होते .