पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा येथील सत्यनारायण मंदिर जवळ दिनांक 08/06/2022 रोजी जबरी चोरी करणाऱ्या या तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतलेआहे.
दिनांक 08/06/2022 रोजी मुंदाने येथील श्री अमोल दगडू पाटील हे रात्री पारोळा वरून मुंदाने येथे घरी जात असताना त्यांना 3 अनोळखी इसमांनी लूटमार करून त्यांच्याकडून त्याचा 10000/- किमतीचा मोबाईल, पाकीट , त्यामध्ये बाराशे रुपये रोख व इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रे होती ते अनोळखी 3 इसमांनी गाडी अडवून धमकावून बळजबरीने चोरी केली होती अशी फिर्याद पारोळा पोलीस स्टेशन येथे दाखल असून त्यावरून पारोळा पोलीस स्टेशन येथे cr no 191/22 IPC 392,34 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याचा तपासामध्ये काही विधीसंघर्षग्रस्त बालक/अल्पवयीन मुले यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यावर विधिसंघर्षग्रस्त बालक 1) देवेन नंदकुमार चौधरी वय 17 रा. आझाद चौक पारोळा 2) सागर सुनील महाले वय 17 वर्ष रा राजीव गांधी नगर पारोळा 3) सोमनाथ एकनाथ नाथजोगी वय 16 वर्ष यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावरुन त्यांना आज रोजी पारोळा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास करता फिर्यादी अमोल दगडू पाटील यांचा 10000/- रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल व चोरीस गेलेल्या रकमेपैकी 500 रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केलेली आहे विधिसंघर्षग्रस्त मुलांना पारोळा पोलिसांनी मा.पीठासीन अधिकारी जळगाव यांच्या समक्ष हजर करण्यासाठी पाठवले आहे. सदरची कामगिरी पारोळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी API रवींद्र बागुल सह, API निलेश गायकवाड PSI राजू जाधव PSI शेखर डोमाळे पोलीस शिपाई किशोर भोई या पथकाने केली आहे.